Damodar
ब्रह्मांड ज्याचे क्रीडांगण समग्र सृष्टी ज्याचे अधीन भक्तांच्या भक्तीस्तव हे विश्वचैतन्य दारी प्रगटले यशोदेच्या समस्त जो घेई आकर्षून कृष्ण तयाचे नाव खोडकर तयाच्या बाळलीला का असतील ह्याला अपवाद? अशाच एके दिवशी खेळत असता श्रीपती दृष्टी पडली तयाची अंगणातील गोरस पात्रावरी गोरस थोडे खाऊन त्यात खेळू लागला कान्हा जमवून मर्कटांचा मेळा त्यांनाही भरवू लागला अंगणातील हा भलता खेळ पाहुनी यशोदा चकित रागे भरुनी हृषिकेशाला बांधू लागली उखळाला आणुनी एक दोर बांधिला कटीभोवती जगदपतीच्या जो चालवितो जगताला ऊर्जा पुरवे ब्रह्मांडाला भक्तीस्तव भक्तांच्या तो झाला दामोदर बाळ रांगूनी पुढे गेला उखळीने भंगले वृक्षांना कुबेर पुत्रांना दिली मुक्ती अशा किती कथा देवाच्या! किती कृष्ण कृपेच्या गोष्टी दामोदर लीला ऐशी वेळोवेळी भक्तांच्या प्रेमाला उत्तर देशी