Sunga
जिथे वाहते पाणी त्याला तसाच चढतो रंग तसा बदलतो आकार मनाचा जसा आपुला संग संग जसा मिळतो वाऱ्याला गंध तसा दरवळतो आपुल्या इच्छांचाही ठेवा मित्रांपाशी मिळतो फुल उमलते सूर्यासंगे कोमेजून धुक्यासव जाते भरकटते मन कुणासवें तर स्थिर कुणासव होते श्याम जिथे मिळतो राधेला दोघांना भक्ती उमजते तसाच दे रे संगही मजला ज्याच्याने स्थैर्य गवसते