Sunga
जिथे वाहते पाणी त्याला तसाच चढतो रंग
तसा बदलतो आकार मनाचा जसा आपुला संग
संग जसा मिळतो वाऱ्याला गंध तसा दरवळतो
आपुल्या इच्छांचाही ठेवा मित्रांपाशी मिळतो
फुल उमलते सूर्यासंगे कोमेजून धुक्यासव जाते
भरकटते मन कुणासवें तर स्थिर कुणासव होते
श्याम जिथे मिळतो राधेला दोघांना भक्ती उमजते
तसाच दे रे संगही मजला ज्याच्याने स्थैर्य गवसते
Comments
Post a Comment