khelani
छोटा रबरी बॉल मजा त्याची मोठी जिन्यावरती सोडला कि यायचा पाठी पाठी अंगावरती लेऊन इंद्रधनुचे रंग भिरभिरणारी भिंगरी वार्यासंगे दंग लटक्या आटपाट नगरी लटके राजा राणी लटक्या भातुकलीचे लटके खाऊ, पाणी गोल गोल फिरता भोवरा संधान दोऱ्यासंगे बांधून बाहुली सोबत खेळताना सारा स्वयंपाक झाला रांधून किती होती खेळणी सारी माळ्यावरती पडली तंत्रन्यानाला घाबरून कशी कोपऱ्यामध्ये दडली पोकेमॉनला शोधताना सागरगोटे गेले हरवून हायटेक जगामधले सारे बालपण गेले बदलून जग बदलणारेच असते त्याची खंत काहीच नाही तरी दोरीवाल्या गाडीची आठवण उगाच येतच राही.