khelani

छोटा रबरी बॉल 
मजा त्याची मोठी 
जिन्यावरती सोडला 
कि यायचा पाठी पाठी 

अंगावरती लेऊन 
इंद्रधनुचे रंग 
भिरभिरणारी भिंगरी 
वार्यासंगे दंग 

लटक्या आटपाट नगरी 
लटके राजा राणी 
लटक्या भातुकलीचे 
लटके खाऊ, पाणी 

गोल गोल फिरता भोवरा 
संधान दोऱ्यासंगे बांधून 
बाहुली सोबत खेळताना 
सारा स्वयंपाक झाला रांधून 

किती होती खेळणी 
सारी माळ्यावरती पडली 
तंत्रन्यानाला घाबरून 
कशी कोपऱ्यामध्ये दडली 

पोकेमॉनला शोधताना 
सागरगोटे गेले हरवून 
हायटेक जगामधले 
सारे बालपण गेले बदलून 

जग बदलणारेच  असते 
त्याची खंत काहीच नाही 
तरी दोरीवाल्या गाडीची 
आठवण उगाच येतच राही. 

Comments

Popular posts from this blog

A lesson of a woman who is no one

Always Ask Questions

And at the end I am yours