Unhaalyaachi sutti
उन्ह्याळाची सुट्टी तुमची अन आमची थोडी वेगळी थोडी सारखी पण असते मात्र मजेची आम्ही खायचो आंबे तुम्ही तोडता चेरी दोघांनाही माहिती सारी आईस क्रीम ची मज्जा खरी गावाची मजा न्यारी झुकझुक अगीन गाडी तुमची मात्र विमानातून साता समुद्रापार उडी कॅसेट वरचे सिनेमे आणि पत्ते आमचे दुपारच्या वेळी तुमचे मॉल आणि मल्टिप्लेक्स देती कंटाळ्याला टाळी बाकी खेळ आपले सारखे नावे असली जरी नवी तुम्ही काय आम्ही काय राव अशी सुट्टी मात्र हवी!