Prem
प्रेम, सतत कानावर पडणारा, गाण्यांतून डोकावणारा शब्द. त्यामुळे थोडी जाणीव आल्यांनंतर प्रेम शोधण्याचा प्रवास सुरु होतो. खरं तर आपण दुसऱ्यात प्रेम शोधताना आपल्या आत ते कुठे आहे आणि नक्की काय आहे हेच शोधत असतो.
खरंच, एवढे सगळे जण एवढा सारखा प्रेमाचा जयजयकार करत असतात. हे प्रेम आहे तरी काय? आपल्याला ते स्वतःत गवसलं आहे का?
लहानपणी कितीही मातृप्रेम, पितृप्रेम वगैरे वाचलं असेल तरी तोपर्यंत मला तरी त्याची काहीच जाणीव नव्हती. पहिलं प्रेम जाणवलं ते देशप्रेम. शिवाजी महाराज, क्रान्तिकारी ह्या आणि अशा अनेक गोष्टींमधून ते उलगडत गेल. राष्ट्रगीत ऐकलं, आंतरराष्ट्रीय खेळ पाहिले कि ते उफाळून आल्यासारखं वाटायचं. आताही खूप ओढ़ आणि आदर आहेच पण ते जर प्रेम असतं तर फक्त वेगळ्या जीवनशैली साठी देश सोडून परदेशात आले नसते.
दूर आल्यानंतर जाणवलेल प्रेम म्हंणजे आई वडील आणि त्या कुटुंबावरचं प्रेम. कुटुंबाची आठवण, काळजी सारी खरी आणि ओढही अस्सल. पण कधी वाटत ती प्रेमाची ज्योतही आधी गरज आणि आता कर्तव्य ह्यांनी काजळलेली आहे.
तरुणपणी सापडलेलं ते जोडीदारावरचं प्रेम. आधी आकर्षण, मग ओढ़ आणि नंतर हा सारा कच्चेपणा जाऊन, सहवासाने पिकून अगदी मधाळलेला प्रेम. पण त्यातही स्वतःचा विचार आधी. थोडं फार स्वतःला दिलं सुद्धा नात्यात पण पूर्ण विसर नाहीच स्वतःचा. मग तेही काही बावनकशी प्रेम नाहीच म्हणायच
मग मात्र नवाच एक अध्याय सुरु झाला आणि प्रेमाचं पूर्ण दर्शन झाल . हि प्रेम कथा सुरु झाली जेंव्हा मी तिला पाहिल देखिल नव्हतं . फक्त ती माझ्या पोटात जन्म घेत आहे हे कळल्या बरोबरच सारा मी पणा संपला. तेंव्हा पासून अगदी स्वतःची काळजी सुद्धा अशासाठी घ्यायला सुरुवात केली कि जेणेकरून तिला काही त्रास होऊ नये. आताही सार जग मुलीभोवतीच फिरतं. त्या मजेत कि आपण मजेत. त्या उदास कि आपण बेचैन. वेळ आणि आयुष्य बदलत राहतं . कदाचित एक वेळ अशी येईल कि मुली आयुष्याचा केंद्र बिंदु राहणार नाहीत. पण आता तरी नुसत्या ह्या विचारानेच अपराधी वाटतं
मला तरी आतापर्यंतच्या आयुष्यात सापडलेलं खरं प्रेम हेच आहे. ते कोणत्याही गोष्टींनी आचछादलेलं नाही. इंगजीत आपण "फॉल इन लव " म्हणतो. म्हणजे प्रेमात आपण आपला काही भाग, स्वत्व हरवतो. स्वतःला बर्याच अंशी विसरायला लावणार हेच प्रेम मला अजून तरी मिळालेल एकमेव प्रेम आहे. बाकी सारी नाती खूप छान असली तरी बावनकशी प्रेम हेच आहे.

Comments
Post a Comment