Shiv jyoti
परतंत्राच्या भयाण रात्री शिवज्योत उमटली भयग्रस्त होऊनि गारठलेली रक्ते धमान्यांत उसळली अत्याचार सोसूनी हतप्रभ झाली माती तव स्पर्शाने तलवार जाहली गवतांची हि पाती किती महाभारते पाहिली इथे द्रवपदीने तुज काय धाडिले तिच्याच गोविंदाने? नवजोमाने उभारली पुन्हा हि देवस्थाने आता तुला पूजितो देवाच्या श्रद्धेने तू स्वयंप्रकाशी सूर्य नव्या तेजाचा दीधलास प्रकाश तू आम्हा स्वाभिमानाचा