Shiv jyoti

परतंत्राच्या भयाण रात्री 
शिवज्योत उमटली 
भयग्रस्त होऊनि गारठलेली रक्ते 
धमान्यांत उसळली 

अत्याचार सोसूनी 
हतप्रभ झाली माती 
तव स्पर्शाने तलवार जाहली 
गवतांची हि पाती 

किती महाभारते पाहिली 
इथे द्रवपदीने 
तुज काय धाडिले 
तिच्याच गोविंदाने? 

नवजोमाने उभारली 
पुन्हा हि देवस्थाने 
आता तुला पूजितो 
देवाच्या श्रद्धेने 

तू स्वयंप्रकाशी 
सूर्य नव्या तेजाचा 
दीधलास प्रकाश तू 
आम्हा स्वाभिमानाचा 

Comments

Popular posts from this blog

A lesson of a woman who is no one

Always Ask Questions

And at the end I am yours