Paay thev mokla
सांभाळ स्वतःला हे मना हरवून तू जाऊ नको परक्या पुन्हा गावामध्ये हरवून ते जाणे नको मृगजळी आहेत ते सुखद जे भासती झरे कल्पना असती तुझ्या हे बंध नाही रे खरे तुज आपले जे वाटते फसवेच मायाजाल हे मग कसे इथे मिळावे तुला शाश्वत जे तुजला हवे चालणे अनिवार्य आहे पण तोल सावर रे तुझा गुंतू नको गुंत्यात ह्या तू पाय ठेवी मोकळा