Paay thev mokla

सांभाळ स्वतःला हे मना 

हरवून तू जाऊ नको 

परक्या पुन्हा गावामध्ये 

हरवून ते जाणे नको 


मृगजळी आहेत ते 

सुखद जे भासती झरे 

कल्पना असती तुझ्या 

हे बंध नाही रे खरे 


तुज आपले जे वाटते 

फसवेच मायाजाल हे 

मग कसे इथे  मिळावे तुला 

शाश्वत जे तुजला हवे 


चालणे अनिवार्य आहे 

पण तोल सावर रे तुझा 

गुंतू नको गुंत्यात ह्या 

तू पाय ठेवी मोकळा 


 

Comments

Popular posts from this blog

A lesson of a woman who is no one

Always Ask Questions

And at the end I am yours