Shraavan

श्रावण म्हणजे हिंदू महिना. आषाढानंन्तर येणारा.

श्रावण म्हंणजे, ऊन पावसाचा खेळ. अवचित गाठणारा पाऊस. पावसात भिजण्यासाठी "छत्री विसरले ", असा केलेला बहाणा.

श्रावण म्हणजे आई-बाबांसोबत पावसाळी सहल. मुंबई जवळचा हिरवा गार निसर्ग. हिरवा शालू ओढलेले डोंगर , वाहणारे झरे. आकाशातील इंद्रधनुष्य, उडणारे बगळे.

श्रावण म्हणजे शाळेतल्या पावसाच्या कविता. नवीन सौंदर्य दाखवणाऱ्या. कविता लिहिण्यासाठी उत्साह देणाऱ्या. तरल भावना जागवणाऱ्या 

श्रावण म्हणजे श्रावणी सोमवार. देवघरातील पूजा. देवळातील गर्दी. प्रसादाची वाटणी. गोडा- धोडाची  देवघेव. मोठ्यांचा  उपास आणि संघ्याकाळी लवकर जेवणं . अळुवडी , पुरी आणि पक्वानं .

श्रावण म्हणजे केवढे सगळे सुवास! पावसाने भिजलेल्या ओल्या मातीचा, अगरबत्तीचा, खमंग जेवणाचा. 

श्रावण म्हणजे मंगळागौर . रात्री जागरण. खेळ  आणि गप्पा. नटणं मुरडणं . साड्या आणि दागिने. 


श्रावण म्हणजे राखी . दादासाठी मिठाई बनवण्याचा नवशिका प्रयत्न. ओवाळणी आणि कौतुक. भावंडांची पुनर्भेट. 

आता श्रावण म्हणजे परदेशात येणाऱ्या आठवणी. इंटरनेट वर पाठवलेल्या शुभेछ्या . मुलांसाठी आणि स्वतःसाठी नव्या आठवणी निर्माण करण्याचा नवा प्रयत्न! 








Comments

  1. Yes... Shravan has a very special significance..genius of this country's thinkers in terms of connecting humans with ecology is exemplified vividly in Shravan traditions. This indeed calls for revival again. Nice spot 😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

A lesson of a woman who is no one

Always Ask Questions

And at the end I am yours