प्रकाश

देहाची पणती आणि मनाची वात 
आता तरी जाणिवेची उजळू दे ज्योत 

किती दिन अंधारात चाचपडत चालले 
किती वाया गेले किती थोडेसे राहिले 

अजूनही धुक्यामध्ये धूसरली वाट 
किती अशी चालू, कधी होईल पहाट ? 

किती यत्न केले, दिवे उसने आणले 
प्रकाशाचे मर्म तरी नाहीच जाणले 

कोणी वाचा म्हणे ग्रंथ, कोणी करा सांगे भक्ती 
व्याधी सुटावी कशी हि कोणी सांगा ना रे युक्ती! 

पाठराखीण हि माती, उडायला हे आकाश 
का गवसत नाही तरी आतला प्रकाश 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

A lesson of a woman who is no one

Always Ask Questions

And at the end I am yours