Daryaa
मऊशार तुझी हि वाळू
पावलांशी बघे ती खेळू
कशी चमचमते किरणांनी
जणू पृथ्वीवरती तारे
गारुड तुझे हे सारे
उंच तुझे ते माड
आभाळा भिडती द्वाड
झावळ्यांची गूढ ती गीते
नवचैतान्याचे वारे
गारुड तुझे हे सारे
वाऱ्यात सुखद गारवा
रंग आभाळाचा नवा
श्वासांत भरुनी घावे
अस्तित्व तुझे हे खारे
गारुड तुझे हे सारे
लाटांची तुझीया गाज
जणू चंद्राचा आवाज
होतात तुझ्या स्पर्शाने
अणुरेणू पुलकित कारे
गारुड तुझे हे सारे
दडली किती रहस्ये पोटी
मंथनात दिधल्या भेटी
अजूनही वेचतो आम्ही
शंख, शिंपले, समुद्री तारे
गारुड तुझे हे सारे
Comments
Post a Comment