Devi
हे शिवानी भगवत्ये
शक्ती रूपिणी अंबिके
अव्यक्त शिव तव शक्तीने
सर्वत्र व्यक्त होतसे
काली तू संहारिणी
अहंकार सारा जाळीशी
दुर्गा तू सिध्दिदायिनी
भवसागर दुर्गट तारीशी
त्या शिवाची कणव तू
अन्नपूर्णा जीवनदायिनी
न्यान तू वागीश्वरी
तू त्या शिवाची रागिणी
सौभाग्य दायिनी लक्ष्मी तू
भक्तांची तू संतोषींनी
व्यक्त असून भावांत तू
तूच वैराग्य दायिनी
Comments
Post a Comment