Niraakaar
नसूनही असणे तुझे
माझ्यात रे सामावले
अव्यक्त तू तरी व्यक्त ही
तव थांग ना परी गावले
तव रंग ना अन गंधही
आकार ना निराकार तू
परी अस्तित्व सारे हे तुझे
इंद्रियांतुनि मज गवसले
निर्गुण तू भावहीनही
तरी भक्तांनी तुजला पकडले
जे जे स्वतःला विसरले
त्यांसी मर्म तुझे हे समजले
Comments
Post a Comment