Unhaalyaachi sutti

उन्ह्याळाची सुट्टी 
तुमची अन आमची 
थोडी वेगळी थोडी सारखी 
पण असते मात्र मजेची 

आम्ही खायचो आंबे 
तुम्ही तोडता चेरी 
दोघांनाही माहिती सारी 
आईस क्रीम ची मज्जा खरी 

गावाची मजा न्यारी 
झुकझुक अगीन गाडी 
तुमची मात्र विमानातून 
साता समुद्रापार उडी 

कॅसेट वरचे सिनेमे आणि पत्ते 
आमचे दुपारच्या वेळी 
तुमचे मॉल आणि मल्टिप्लेक्स 
देती कंटाळ्याला टाळी 

बाकी खेळ आपले सारखे 
नावे असली जरी नवी 
तुम्ही काय आम्ही काय 
राव अशी सुट्टी मात्र हवी! 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

A lesson of a woman who is no one

Always Ask Questions

And at the end I am yours