ganpati Bappa Morya

धो धो पाऊस कमी जाहला 
सणासुदीचा श्रावण गेला 
आता आगमनाची करा तयारी 
बोला गणपती बाप्पा मोरया 

सजतील दारे फुलाफुलानी 
स्वागताची होईल तयारी 
रंगरंगुनी नटतील मखरे 
बोला गणपती बाप्पा मोरया 

वाजत गाजत येईल मूर्ती 
मनामनांतून  भरेल स्फूर्ती 
मंगलमूर्ती करतील मंगल 
बोला गणपती बाप्पा मोरया 

पूजेसाठी जुडी दुर्वांची 
ओंजळ जास्वदींच्या फुलांची 
नैवैद्याला मोदक लाडू 
बोला गणपती बाप्पा मोरया 

आरतीसाठी सगेसोयरे 
हास्यांने भरतील मग घरे 
खरीच मूर्ती चैतन्याची 
बोला गणपती बाप्पा मोरया 

Comments

Popular posts from this blog

A lesson of a woman who is no one

Always Ask Questions

And at the end I am yours