Premache aukshan

मज हसवू पाहती किती  पावसाळे 
पण आहे सारे तुझ्याच ना बळे 
भास्करा तुज वाचून व्यर्थच सारे 
असो तो चंद्र वा असतील तारे 

आणतो जरी त्या शीतल धारा 
तुज वाचून कुठला हा पावसाळा 
लोपेल तुझे का तेज कधी ते 
झाकतो जरी तुज ढग तो काळा 

धाडतो रोज चांदणे मजसाठी 
चंद्र नभातून करी विनवण्या 
तूच खरा पण स्वयंप्रकाशी 
तो तर जगतो किरणांवर उसन्या 

वाट पाहाते, फिरत राह्ते 
कक्षेत तुझ्या मी सतत भास्करा 
तूच खरा तो तेजस्वी नर 
भुलवित नाही मज नक्षत्र पिसारा 

तव किरणांच्या मधू स्पर्शाने 
विसरते मी विरहाचे ते क्षण 
तुझ्याच भवती फिरुनी करते 
प्रेमाचे मी तुजला औक्षण  

Comments

Popular posts from this blog

A lesson of a woman who is no one

Always Ask Questions

And at the end I am yours