Shiv
भल्याबुऱ्याच्या सीमारेषा
विलीन जिथे होतात
पुसून जाते लटकी ओळख
राहते ते शिव तत्व
सर्व जगाला असते व्यापून
जे असून येथे नाही
असे शिवाने समयांकित सारे
परी मृत्यू शिवाला नाही
अहंकाराच्या कटू विशाला
प्राशन ह्याने केले
काम जाळला आणि जगाला
योगामृत हि दिधले
अनंत आणि सर्वव्यापी हा
तरीही भोलेनाथ
भक्त असो मग देव कि दानव
हा कधी न सोडी साथ
योगामृत हि दिधले
अनंत आणि सर्वव्यापी हा
तरीही भोलेनाथ
भक्त असो मग देव कि दानव
हा कधी न सोडी साथ
Comments
Post a Comment