Marathi

अस्त जाहल्या साऱ्या आशा 
बिगुल परतंत्राचे वाजले 
सूर्य उगवला नवं  क्रान्तीचा 
त्याचे नाव शिवाजी राजे 
 
भवजालाचा सोडवण्या गुंता 
मंत्र दिला सत्संग 
किती जाहले संत, महात्मे 
दिल्या ओव्या आणि अभंग 
 
घाम गाळूनी घडविली मुंबई 
दिली जगाला भेट
उद्योगाची केली राजधानी 
नाव जगन्नाथ शंकर शेठ 
 
टिळक, सावरकर , आगरकर 
आणि किती लाभली नावे 
लढूनि लढ़ा स्वातंत्र्यासाठी 
परकीयांना धाडले त्यांच्या गावे 
 
चित्रफितीच्या नवतंत्राने 
नवरस पडद्यावर आणले 
चित्रमहर्षी म्हणती त्यांना 
नाव दादासाहेब फाळके 
 
म्हणतात हिला गानकोकिळा 
नांदे कंठात दैवी स्वर 
वरदान हिला असे शारदेचे 
नाव लता मंगेशकर 
 
विश्वात खेळाच्या किती गाजला 
दिली तरुणांना स्फूर्ती नवीन 
कोणी म्हणती देव क्रिकेटचा 
नाव असे त्याचे सचिन 
 
कितीक नावे अशीच घ्यावी 
मराठी आहे जगाची शान 
भाग्यच माझे मी बोलते मराठी 
किती बाळगू मी अभिमान 
 
 


Comments

Popular posts from this blog

A lesson of a woman who is no one

Always Ask Questions

And at the end I am yours