Aai
किती ऐकल्या गोष्टी आणिक किती ऐकली गाणी
सारे म्हणती महिती आईची जगात असते न्यारी
म्हणून म्हटले शोधू जाणीव मनातली मग माझ्या
पूर्वग्रह दूषित नसेल जी अन ती जुने ते बाजूस सारी
जग दिसले मज तुझ्यात पहिले
रंग, गंध भरलेले
तुझ्या सयीने व्यापून असती
दिवस जे बालपणी सरलेले
जरी दूर तरी सदैव असशी
सोबतीस तू माझ्या
दिसणे माझे व्याप्त खुणांनी
अन लकबीही साऱ्या तुझ्या
संकट समयी कधीही न चुकता
विचार येतों तुझा
तूही लढलीस , लढेन मी हि
विश्वासच असतो माझा
अशी तेवशी सदैव अंतरी
जसा तिमिरा मधला दिवा
व्यक्त कराया नाते अपुले
वेगळा मातृदिन कशाला हवा?
खूपच छान, सुंदर 👌👌👌👍
ReplyDeleteखूप छान 👌👌
ReplyDelete