Radha Krishna

 रंगात प्रेम, भक्तीच्या 

संगती तुझ्या रंगावे 

होशील कृष्ण तू जेंव्हा 

मन राधा राधा व्हावे 


भव चिंतेत गुंतता मन हे 

साहचर्य तुझे लाभावे 

शोधून प्रेम मार्गाला 

मुक्तीस सहज साधावे

 

भवसागरी डुंबत असता 

भावनांचे सुकाणू व्हावे 

सहप्रवास तव लाभावा 

अन पैलतीर गाठावे 


Comments

Popular posts from this blog

A lesson of a woman who is no one

Always Ask Questions

And at the end I am yours