Gandh Tuza Urlela

 जाणिव सुखाची देतो 

हा गन्ध तुझा उरलेला 

दारात फुले माळूनी 

तो पारिजात फुललेला 


कानात गोडवा आहे 

तव खट्याळ त्या बोलांचा 

मग जर सहज रक्तिमा येतो 

त्यात दोष काय गालांचा 


आठवूनी तुझ्या स्पर्शाला 

रोम रोम शहारून जाते 

काळ जरी तो सरुनी गेला 

गोड़ घट्ट राहिले नाते 

Comments

Popular posts from this blog

A lesson of a woman who is no one

Always Ask Questions

And at the end I am yours