Karmayogi
क्षमा शोभते त्या राजाला
जो सत्ता सुख भोगी
धर्म स्थापण्या धरी खडग जो
तोच खरा श्रीमान योगी
कसले कौतुक दुबळ्या शरीरी
जो बोल अहिंसा बोले
भरल्या पोटी न्यान देणारे
किती आले अन गेले
तो वीर खरा जो असे धनुर्धर
तरीही युद्ध नाकारी
अन तोच खरा जो नेता
आपुल्या प्रजेसाठी जो हार स्वीकारी
तत्वन्यानी बाता नुसत्या
जिथे जीव उपाशी राबे
माझे वंदन त्याच वीराला
जो लढून कर्मयोग साधे
So simple to understand yet so deep in thoughts... Thank you for sharing such wonderful thought.
ReplyDeleteThanks
Delete