Toh aani Tee
भारतातले तो आणि ती
तो करायचा नोकरी
आणि घरात राबवायची ती
त्याच्या मागे बाहेरचे व्याप
आणि घरच्या उस्तवाऱ्या
काढायची ती
स्वयंपाक पाणी ,
घराची स्वच्छता,
मुला-मोठ्यांचे आजार,
सण, पाहुणे
मुलांचे अभ्यास
परीक्षा आणि हट्ट
सुट्टीची तयारी
एवढी तिची कामं
त्याला त्रास नको म्हणून
हातात सारं आणून ठेवायची
काही कमी पडलं
तर वेळ मारून न्यायाची
आता तीही बाहेर जाते
नोकरी तीही करते
घराचं अजूनही बघते
आपल्यासाठीही जगते.
त्याने थोडी मदत केली
कि सगळे त्याचं केवढं कौतुक करतात!
आठवड्यातून एक दिवस
चहा केला तर किती स्तुती करतात !
घरात बाहेर सारं सांभाळून
ती नेटनेटकी राहते
मुलांच्या पीटीए ला फॉर्मल
आणि दिवाळीला नववारी नेसते
"फराळ विकतचा आणला"
म्हणून असते कधी तक्रार
तर " बाहेरच्या पुराणपोळीला हिच्या हाताची चव नाही"
म्हणून मिळते कधी प्रोत्साहन
बाहेरच्या जगातल्या शर्यतीत
बरीच बरोबरी गाठली आहे
घरातल्या प्रवासात मात्र
विसावा अजून दूरच आहे!
खूप छान 👌
ReplyDeleteThanks
Delete