Jasaa saarathi parthacha

 साऱ्या भिंती आधाराच्या हळू हळू कोसळून पडताना 

बाळगलेली सारी मूल्ये निकामी, पोकळ निघताना 

भल्या बुऱ्याची निष्फळ स्वप्ने डोळ्यांपुढून  विरताना 

धागे कच्च्या विश्वासाचे विणीतून अलगद उसवताना 

जवळ राहा तू जसा सारथी जवळ राहिला पार्थाचा 


शांत समुद्री जहाज नेता अचानक वादळ कोसळले 

दीपस्तंभाच्या आशेचे बुरुजही नकळत ढासळले 

भावनांच्या काळ्या लाटांमध्ये चंद्रबिंबहि विरघळले 

काळोख्या ह्या भयाण राती मन कार्पण्य दोषे बावरले 

जवळ राहा तू जसे ध्रुवाचे मन होते विश्वासे प्रकाशले


नाही भक्ती, विश्वासही हलका, ज्ञानही नाही कसलेही 

भयग्रत ह्या मनात माझ्या  आशाही नावापुरती राहिलेली 

धावधावूनी दहा दिशांना धमकहि थोडीच उरलेली 

सरत्या निसटत्या वयासोबती दिवास्वप्नेही सरलेली 

जवळ राहा तू तरीही जैसी प्रीत राधेची न विसरलेली 


जवळ राहा तू जरी सारे विरून जाईल धुक्यामध्ये 

शब्दही विरतील, देहभान अन मनही विरेल  काळामध्ये 


Comments

Popular posts from this blog

A lesson of a woman who is no one

Always Ask Questions

And at the end I am yours