ganpati Bappa Morya
धो धो पाऊस कमी जाहला सणासुदीचा श्रावण गेला आता आगमनाची करा तयारी बोला गणपती बाप्पा मोरया सजतील दारे फुलाफुलानी स्वागताची होईल तयारी रंगरंगुनी नटतील मखरे बोला गणपती बाप्पा मोरया वाजत गाजत येईल मूर्ती मनामनांतून भरेल स्फूर्ती मंगलमूर्ती करतील मंगल बोला गणपती बाप्पा मोरया पूजेसाठी जुडी दुर्वांची ओंजळ जास्वदींच्या फुलांची नैवैद्याला मोदक लाडू बोला गणपती बाप्पा मोरया आरतीसाठी सगेसोयरे हास्यांने भरतील मग घरे खरीच मूर्ती चैतन्याची बोला गणपती बाप्पा मोरया